LIVE UPDATES

गोवा बनावटीच्या दारु वाहतूकीप्रकरणी एकाला अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : १२ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 10, 2026 21:35 PM
views 206  views

कणकवली : दारिस्ते-पवारवाडी येथे गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या स्विफ्ट कारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. या कारवाईत विदेशी मद्याचे ३१ बॉक्स आणि स्विफ्ट कार असा एकूण १२ लाख ९० हजार २३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नितीन ज्ञानदेव वासुदेव (वय ३४, रा. भेंडकुडे वासुदेव गल्ली, स्मशानभूमीजवळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेण्यात आले.

दारिस्ते-पवारवाडी येथे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सिल्व्हर रंगाची स्विफ्ट कार तपासणीसाठी थांबवली. कारची तपासणी केली असता गोवा राज्य निर्मित विविध ब्रँडच्या विदेशी मद्याचे ३१ बॉक्स आढळून आले. या मद्याची अंदाजे किंमत ६ लाख ९० हजार २३० रुपये, तर कारची किंमत ६ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मद्यसाठा व वाहन असा एकूण १२ लाख ९० हजार २३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर व अधीक्षक सिंधुदुर्ग कीर्ती शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नितीन शिंदे, जवान स्नेहल कुळेसकर, अजित गावडे तसेच जवान-वाहनचालक हेमंत वस्त यांनी केली. कारवाईसाठी साजिद शहा व सलाउद्दीन खान यांनी मदत केली.