
सावंतवाडी : तिरंगा हा केवळ ध्वज नसून देशाचा स्वाभिमान, त्याग, शौर्य आणि एकतेचे प्रतीक आहे, असे सांगत भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. माजी सैनिकांना तिरंगा यात्रेत मानाचे स्थान देऊन गौरविण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले.
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेप्रमाणे भाजपा युवा नेते विशाल परब तसेच या हर घर तिरंगा यात्रेचे जिल्हा संयोजक संदीप गावडे आणि भाजपा सावंतवाडी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांनी मिळून सावंतवाडी शहरात भव्य तिरंगा यात्रेच्या आयोजन केले होते. या यात्रेला नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत मोठ्या उत्साहात ही यात्रा संपन्न झाली. यावेळी पालकमंत्री नितेश राणे,आमदार दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, तिरंगा यात्रा अभियान प्रमुख संदीप गावडे, नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, युवराज लखम राजे भोंसले, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, विक्रांत सावंत, सुदन कवठणकर, मायकल डिसोजा, महेश सारंग, भाजप शहराध्यक्ष तथा नगरपरिषद सभापती सुधीर आडीवरेकर, महिला शहराध्यक्षा सौ. मोहिनी मडगावकर यांच्यासह भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक-नगरसेविका, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच तसेच असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार दीपक केसरकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात भारताचे स्थान उच्च स्थानावर नेऊन ठेवले असून भारताला जगात प्रत्येक ठिकाणी सन्मानाने वागणूक दिली जाते हे अमेरिका आणि इराणच्या युद्धात देखील स्पष्टपणे उघड झालेले आहे इराणने युद्ध नौका संरक्षणाबाबत घेतलेल्या धोरणावर भारताने सज्जड दम दिला आणि त्यावेळी भारताला इराणने सन्मानाची वागणूक दिलेली आहे असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे महात्मा गांधींचा असंहीतेच्या लढ्याने देखील जगात भारत शांतता प्रिय म्हणूनच ओळखला जातो आज जगभरात महात्मा गांधींचे महत्त्व स्पष्ट झाले असून शांततेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी मुळे भारताला वैभव शाली देश म्हणून ओळखले जाते. देशाचा तिरंगा राष्ट्रध्वज अभिमानाने हातात सर्वजण घेतात संयोजक संदीप गावडे आणि विशाल परब यांनी उत्तम आयोजन केले आहे असे केसरकर यांनी यावेळी सांगितले यावेळी माजी सैनिक बाबुराव कविटकर दीपक शिर्के संजय सावंत तातोबा गवस धनंजय राऊत अशा मान्यवरांचा सन्मान विशाल परब, संदीप गावडे उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर आदींनी केला.
संयोजक संदीप गावडे म्हणाले, भव्य दिव्य तिरंगा यात्रेने देशाचे राष्ट्रप्रेम सर्वांसमोर गेले विशाल परब यांनी उत्तम आयोजन नियोजन केले होते आता घराघरात तिरंगा फडकावला पाहिजे. हा राष्ट्रीय महोत्सव आहे असे त्यांनी सांगताना वंदे मातरम ला देखील १५० वर्ष पूर्ण होत असल्याने ह्या महोत्सवाला आगळे वेगळे स्वरूप आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी तिरंगा यात्रा उत्स्फूर्तपणे झाली. विकसित भारत त्यावर विकसित भारत अवलंबून असलेली युवा विद्यार्थी वर्ग देखील यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घराघरात तिरंगा फडकायला हवा. तिरंगा ध्वज भारतीयांच्या दृष्टीने शौर्य प्रेरणा शांतता विकास समृद्धी प्रतीचे प्रतीक आहे. भारताचे स्वातंत्र स्वतंत्र्याचा राष्ट्रध्वज आहे. भारत देशाचे भारत देश जगासमोर महागुरु म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणून ठेवला आहे. राष्ट्रप्रेमी नागरिकांनी भारता प्रतीक कायमच प्रेरणा घेऊन २०४७ मध्ये विकसित भारताचे संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडल्याचे ते म्हणाले.
माजी सैनिक बाबुराव कविटकर म्हणाले, तिरंगा सन्मान यात्रेत माजी सैनिकांना प्रथम स्थान देऊन सन्मान केला माजी सैनिकांची देशाप्रती जबाबदारी आहे. माजी सैनिक जबाबदारी स्वीकारली असून देशसेवा आणि जनसेवा ते करत राहतील. समाजाची सेवा करत माजी सैनिक राष्ट्रप्रेम कायमच पूर्णत्वास नेण्यासाठी कटिबद्ध आहेत. सावंतवाडी मध्ये माजी सैनिकांसाठी कॅन्टींग सेवा पूर्ववत करण्यासाठी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असे त्यांनी सांगितले. यावेळी स्वातंत्र्य गिते स्पर्धा विशाल परब यांनी आयोजित केली होती. मुलांनी चांगला प्रतिसाद दिला.











