LIVE UPDATES

कलमठ ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपाचे रवींद्र यादव बिनविरोध

उपसरपंच निवडणुकीसाठी भाजपकडून एकमेव अर्ज दाखल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 10, 2026 21:03 PM
views 40  views

कणकवली : तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायतचे उपसरपंच पद हे राजीनाम्यानंतर रिक्त झाले होते. या रिक्त पदाबाबत आज निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाजपाचे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र उर्फ पप्पू यादव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची या पदावर बिनविरोध निवड झाली.

या निवडी प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, सरपंच संदीप मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर, शक्तिकेंद्र प्रमुख. स्वप्नील चिंदरकर, विजय चिंदरकर, महेश लाड, दिनेश गोठणकर, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, सदस्य नितीन पवार, अनुप वारंग, प्रियाली आचरेकर, तनिष्क लोकरे, स्वाती नारकर, इफात शेख, नजराणा शेख, हेलन कांबळे, श्रेयस चिंदरकर, सचिन खोचरे, प्रीती मेस्त्री, मिलिंद चिंदरकर, आबा कोरगावकर, परेश कांबळी, संतोष रेवंडकर, गणेश पुजारे ऋत्विज राणे, स्वरूप कोरगावकर, समर्थ कोरगावकर, प्रणय शिर्के, समीर राजपूत, महेश मेस्त्री, कैलास साटेलकर, सागर पवार, परेश आचरेकर, नागेश लाड, प्रतीक माइनकर आदी उपस्थित होते.

पप्पू यादव हे भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते असून त्यांच्या निवडीनंतर भाजपा पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. कलमठ गावच्या विकासासाठी येत्या काळात खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच कलमठ जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया मेस्त्री, सरपंच संदीप मेस्त्री भाजपाचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, उपसभापती सोनू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून कलमठ गावाच्या विकासामध्ये सर्वांना सामावून घेत जनतेच्या समस्या सोडवण्यावर माझा भर असणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित उपसरपंच पप्पू यादव यांनी दिली.