
दोडामार्ग : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा दोडामार्ग संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देण्यासाठी साटेली-भेडशी शहर व ग्रामीण कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला. पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नव्या व सक्रिय युवकांना या कार्यकारिणीत संधी देण्यात आली असून, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली.
माजी केंद्रीय मंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र शेटकर, तालुकाध्यक्ष दीपक गवस, तालुका सरचिटणीस संजय सातार्डेकर, तालुका उपाध्यक्ष सुनील गवस, तालुका उपाध्यक्ष आकांशा शेटकर, कोषाध्यक्ष स्वप्नील गवस, शहराध्यक्ष राजेश फुलारी, नगरसेवक समीर रेडकर, सुमित म्हाडगूत तसेच युवा मोर्चा अध्यक्ष पराशर सावंत आदी उपस्थित होते.
भाजप युवा मोर्चाच्या कार्यकारिणी विस्तारात साटेली-भेडशी परिसरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना विशेष संधी देण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून पक्षसंघटनेसाठी प्रामाणिकपणे आणि सक्रियपणे काम करणाऱ्या अनेक नव्या युवकांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये साटेली-भेडशी शहराध्यक्षपदी अरविंद सखाराम धर्णे, शहर उपाध्यक्षपदी मंथन अरुण डिंगणेकर व धनंजय शांताराम धर्णे, तर शहर सरचिटणीसपदी विशांक संतोष घोगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भाजप युवा मोर्चा ग्रामीण कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी निलेश दत्तराम धर्णे, तर चिटणीसपदी राजन पांडुरंग सावंत यांची निवड करण्यात आली आहे. नव्या आणि सक्रिय कार्यकर्त्यांना संघटनात्मक जबाबदारी मिळाल्यामुळे साटेली-भेडशी परिसरात भाजप युवा मोर्चाची ताकद वाढण्यास मदत होणार असून, पक्षसंघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.











