
सावंतवाडी : सावंतवाडीत भव्य तिरंगा यात्रेदरम्यान मार्गात अचानक मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. या वाहतूक कोंडीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचीही गाडी अडकली. कार्यक्रमाची वेळ होत आली होती आणि व्ही.आय.पी. प्रोटोकॉल किंवा गाडी निघण्याची वाट पाहत बसल्यास कार्यक्रमाला उशीर झाला असता. यावेळी त्यांनी थेट रिक्षेतून सावंतवाडी गाठली. वेळ वाया न घालवता कार्यक्रमात वेळेत पोहोचणे याला प्राधान्य देत, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता गाडी सोडली आणि थेट रिक्षाचा प्रवास करत नियोजित वेळेत कार्यक्रमस्थळी हजेरी लावली. साधेपणासाठी परिचित असलेल्या श्री. कामत यांचा परिचय आज पुन्हा एकदा आला.











