किरकोळ वादाचे रूपांतर झटापटीत

रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
Edited by: विनायक गांवस
Published on: June 17, 2025 22:32 PM
views 897  views

सावंतवाडी: आंबोली घाटात साईड देण्यावरून सुरु झालेला वाद सावंतवाडी पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला. याचे  रुपांतर कालांतराने झटापटीत होऊन एका पोलिस हवालदाराच्या खांद्याला दुखापत झाली. 

गोव्यातील १० ते १५ तरुण व बांदा येथील आंबोली पर्यटनासाठी गेलेल्यांत वाद झाला. साईड देण्यावरून झालेला वाद विकोपाला गेला. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिस ठाण्याच्या आवारातही गोवा येथील तरुणांनी गोंधळ घातला‌. पोलिस विचारपूस करत असताना त्यांनी हुज्जत घातली. झटापटीचा प्रयत्न यावेळी झाला. यात एका पोलिस हवालदाराच्या खांद्याला दुखापत झाली. पोलिस निरीक्षकांनी संबंधितावर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.