LIVE UPDATES

दोडामार्गात एलसीबीची मोठी कारवाई

गोवा दारूसह ६ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 29, 2026 15:54 PM
views 170  views

दोडामार्ग : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने दोडामार्ग पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूसह तब्बल ६ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका संशयिताविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई रविवारी रात्री सुमारे ९:४५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. कारवाईदरम्यान संशयित सुनील तुकाराम हिंडगावकर (रा. पाटणे फाटा, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) याच्याकडून १ लाख ६८ हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू तसेच ५ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ६ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी संशयित सुनील हिंडगावकर याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ)(इ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या पथकात पोलीस उपनिरीक्षक सुधीर सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सदानंद राणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल डोमणिक डिसोझा, बस्त्याव डिसोझा आणि जॅक्सन घोणसालविस यांचा समावेश होता.