
कणकवली : कणकवली शहरातील स्टेट बँके समोरून चोरीला गेलेली दुचाकी अखेर दोन महिन्यामध्ये केलेल्या उल्लेखनीय तपासानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी दुचाकी सराईत चोरट्यासहित ताब्यात घेतली. दुचाकी चोरीची घटना 28 फेब्रुवारी 2026 रोजी घडली होती.
कणकवली स्टेट बँके जवळील देवाशिष सुनील कोरगावकर यांच्या मालकीची सुझुकी कंपनीची एक्सेस दुचाकी चोरट्याने पळवली होती. पोलीस तपासा दरम्यान तळेरे येथील गणेश बेकरीच्या पाव भट्टीवर कामाला असलेला सुशांत सिद्धार्थ यादव (19, मूळ श्रावण तालुका मालवण, सध्या राहणार तरळे) या सराई चोरट्याने ही दुचाकी चोरल्याची बाब स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला तपासा दरम्यान समजली होती. याकरिता पोलिसांनी आपली गोपनीय टीम कामाला लावली होती. पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्यावर यापूर्वी दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असून सराईत चोरट्याला आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अटक केली.
ही कारवाई मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग नयोमी साटम, अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर, हवालदार आशिष गंगावणे, ज्ञानेश्वर तवटे, किरण देसाई यांच्या पथकाने केलेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाकडून उत्कृष्ट कामगिरी केली जात असून त्यांच्या या कामगिरीमुळे बद्दल जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.














