LIVE UPDATES

दुचाकी चोरट्यांना 'एलसीबी'ने केली अटक

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 23, 2026 20:07 PM
views 48  views

कणकवली : फेब्रुवारी 2026 मध्ये फोंडाघाटातून दुचाकी चोरून नेणाऱ्या दोघांना एलसीबी पोलिसांनी शिताफीने सापळा रचून कोल्हापूर येथून अटक केली. राहुल प्रकाश बामणीकर (२९), सुहास दत्तात्रय जाधव (२६, दोघेही रा. करवीर - कोल्हापूर) अशी संशयितांची नावे असून दोघांनाही कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

या कारवाईत पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम, एलसीबी पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, हवालदार आशिष गंगावणे, ज्ञानेश्वर तवटे, किरण देसाई आदी सहभागी झाले होते.