
मृत्युचं कोड उलगडण्याचं पोलिसांसमोर आव्हान
सावंतवाडी : करासवाडा येथील भाड्याच्या खोलीत शनिवारी सकाळी सापडलेल्या सोनुर्ली येथील अजय जाधव व त्याचा मुलगा अर्थव या बाप- लेकाच्या मृतदेहावर रविवारी दुपारी सोनुर्लीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार करण्यात आले. तर मृत्यूशी झुंज देण्याऱ्या अजयची पत्नी सुवर्णा जाधव हिचेही मंगळवारी दुपारी उपचार दरम्यान निधन झाले.
आज बाप-लेकाचा मृतदेह जाधववाडी येथील घरी आणताच नातेवाईकांडून एकच टाहो फोडण्यात आला. सोनुर्ली येथील अजय जाधव हा नोकरी निमित्त म्हापसा करासवाडा येथे गेली वर्षभर भाडयाच्या खोलीत मुलगा व पत्नीसह राहत होते. शनिवारी बाप लेकाचा मृतदेह आढळून आला होता. तर पत्नी सुवर्णा हि अत्यवस्थ स्थितीत आढळली होती. पत्नी सुवर्णा (वय ३०) यांची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला उपचाराकरिता गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. मात्र, आज उपचार सुरू असतानाच तिचे दुपारनंतर निधन झाले.
या कुटुंबात भांडण वैगरे काहीच नसायचे. मात्र, त्यांनी सामुहिक आत्महत्येचा निर्णय का घेतला असेल ? की हा घातपात होता ? आदी प्रश्न उपस्थित होत आहेत. हे कोडे सोडविण्याचे मोठे आव्हान गोवा पोलिसासमोर आहे.














