सोनुर्लीत 7 - 8 लाखाचा खैर जप्त

गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाची कारवाई
Edited by: विनायक गांवस
Published on: April 11, 2026 19:53 PM
views 32  views

सावंतवाडी : सोनुर्ली येथे विनापरवाना खैर लाकडाची वाहतूक करून त्याचा मोठा साठा करण्यात आल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करून आजगाव वनपरिमंडळ अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकली असता, त्या ठिकाणी खैर प्रजातीचा नगी आणि किटा माल आढळून आला. वनविभागाने हा सर्व माल जप्त केला असून बाजारभावाप्रमाणे याची किंमत सुमारे ७ ते ८ लाख रुपये इतकी आहे.


या प्रकरणी अधिक चौकशी केली असता, हा विनापरवाना लाकूड साठा निरवडे येथील प्रदीप मातोंडकर यांचा असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर वन कायद्यानुसार वन गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे याप्रकरणी अधिक चौकशी ुरू असल्याचे वन अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. सोनुर्ली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खर झाडाची तोड करून त्याचा साठा केल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना शुक्रवारी सायंकाळी मिळाली त्यानुसार सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे आणि वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजगावचे वनपरिमंडळ अधिकारी पृथ्वीराज प्रताप, वनरक्षक. प्रकाश रानगिरे,. अतुल पाटील आणि वनमजूर चंद्रकांत पडते यांनी केली. घटनास्थळी तब्बल सात ते आठ लाख एवढ्या किमतीचे लाकूड आजवर आले काही लाकूड हे नगी तर काही लाकूड हे किटा स्वरूपाचे होते. हे लाकूड तात्काळ जप्त करत ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेल्या मालाबाबत वनविभागाने रीतसर गुन्हा नोंदवला असून, आजगाव वनपरिमंडळ अधिकारी पृथ्वीराज प्रताप या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या कारवाईमुळे सोनुर्ली सह तालुक्यामध्ये खैर तस्करी करणाऱ्यांमध्ये तसेच अवैध लाकूड व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.