
कणकवली : शहरातील एका हॉटेल-लॉजच्या पाठीमागे आडोशाला राजरोसपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कणकवली पोलिसांनी सायंकाळी 6:30 च्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत शहरातील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांची चाहूल लागताच काहीजण पसार झाल्याची माहिती देखील मिळत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका हॉटेल-लॉजच्या मागील बाजूस काही व्यक्तींकडून जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी जुगार खेळताना पाच जण पोलिसांच्या हाती लागले. काहीजण पसार झाले यावेळी 15 हजार 400 रुपयांची रोख रक्कम व पत्ते आढळून आले
या कारवाईमुळे शहरात सुरू असलेल्या अवैध जुगाराच्या प्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने कणकवली पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांनी पोलिसांनी कठोर पावले उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.














