
सावंतवाडी : 'कोकणसाद LIVE' आयोजित 'बदलतं कोकण' महा रील स्पर्धा २०२६ ला राज्यभरातून मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि स्पर्धकांची वाढती मागणी लक्षात घेऊन आयोजकांनी स्पर्धेच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. स्पर्धकांना अधिक कल्पकतेने आणि उत्तम दर्जाची रील बनवता यावी यासाठी व्हिडिओची वेळ मर्यादा वाढवण्यासोबतच व्हिडिओ अपलोड करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, या स्पर्धेत संपूर्ण कोकण पट्ट्यातील म्हणजेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या सर्व जिल्ह्यांमधील बदलत्या व प्रगत कोकणाचे आणि विकास दाखवणारे व्हिडिओ ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यातील डिजिटल क्रिएटर्सना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
कोकणाची भव्यता आणि विकास अवघ्या ३० ते ६० सेकंदात मांडणे शक्य होत नसल्याची भावना अनेक स्पर्धकांनी व्यक्त केली होती. या मागणीचा विचार करून आयोजकांनी वेळेचे बंधन शिथिल केले असून ३ मिनिटांपर्यंतचा (जास्तीत जास्त ५ मिनिटे) व्हिडिओ बनवण्याची मुभा दिली आहे. याशिवाय, रील अधिक आकर्षक आणि संगीतमय बनवण्यासाठी पार्श्वसंगीतावरील कॉपीराइटचे बंधनही हटवण्यात आले आहे.
स्पर्धेची नवीन रूपरेषा आणि महत्त्वाच्या तारखा:
पात्र जिल्हे: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर
व्हिडिओ अपलोड करण्याची मुदत: ३० सप्टेंबर २०२६
'मोस्ट पॉप्युलर रील'साठी लाईक्सचा कालावधी: ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत
व्हिडिओ वेळ मर्यादा: ३ ते ५ मिनिटे
आकर्षक रोख बक्षिसे:
प्रथम पारितोषिक: ₹११,१११/- रोख
द्वितीय पारितोषिक: ₹७,७७७/- रोख
तृतीय पारितोषिक: ₹५,५५५/- रोख
मोस्ट पॉप्युलर रील: ₹५,५५५/- रोख
उत्तेजनार्थ बक्षीस: ५ क्रिएटर्सना प्रत्येकी ₹१,१११/- रोख
सहभागाची सोपी प्रक्रिया:
१. 'बदलतं कोकण' (आधुनिक, प्रगत व विकासकामांवर आधारित) या विषयावर कोकणातील कोणत्याही ठिकाणची कल्पक रील तयार करा.
२. इंस्टाग्रामवर अपलोड करताना @KokansadLive या अधिकृत अकाऊंटला 'Invite Collaborator' करा.
३. पोस्टसोबत #BadaltKonkan, #KokansadLive, #KonkanReelsCompetition, #ReelCompetition2026, आणि #KonkanArt हे हॅशटॅग्ज वापरणे अनिवार्य आहे.
नियम, व्याप्ती आणि मुदतीत मिळालेल्या या वाढीव सवलतीचा फायदा घेत डिजिटल क्षेत्रातील इन्फ्लुएन्सर्स, रील स्टार्स आणि कंटेंट क्रिएटर्सनी आपली कला सादर करून या महा स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन 'कोकणसाद LIVE' च्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती साठी 9112247479 या क्रमांकावर संपर्क किंवा व्हाट्सअप करा.











