
सावंतवाडी : नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी धोंडू गंगाराम बरागडे (वय ५७, रा. भोगटे नगर) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. धोंडू बरागडे हे गेल्या २६ वर्षांपासून सावंतवाडी नगरपरिषदेत सफाई कर्मचारी म्हणून अविरत सेवा बजावत होते. त्यांच्या जाण्याने नगरपरिषद कर्मचारी वर्गासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, जावई, नातवंडे आणि भाऊ असा मोठा परिवार आहे.











