
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे आणि पणदूर परिसरात आज सायंकाळी अचानक पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. कोणतीही पूर्वकल्पना नसताना आलेल्या या पावसामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांची आणि पादचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
आज दिवसभराच्या कडक उन्हाच्या वातावरणानंतर वेताळ बांबर्डे, पणदूर आणि लगतच्या परिसरात ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे कामावरून घरी परतणाऱ्या तसेच या मार्गावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी चालकांची मोठी धावपळ झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी रस्त्याकडील दुकाने आणि निवाऱ्याचा आसरा घेतला. या हलक्या सरींमुळे परिसरातील वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








