
नवी दिल्ली : सीजेपी नेते सौरभ दास यांच्या विरोधात 'लूक-आउट नोटीस' जारी करण्यात आली आहे. गुरुवारी सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला ही माहिती दिली. बुधवारी दास यांना एक 'शो-कॉज नोटीस'बजावण्यात आली. यामध्ये त्यांच्या पासपोर्टवर नोंदवलेल्या जन्मस्थानाबाबतच्या तफावतीबद्दल स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीही त्यांच्या पासपोर्टमधील माहितीमध्ये तफावत आढळल्यामुळे त्यांना परदेश प्रवासापासून रोखण्यात आले होते. दास यांनी सांगितले की, त्यांना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी स्टुडंट युनियनद्वारे आयोजित एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते, परंतु सरकारने त्यांच्या प्रवासावर बंदी घातली.
सरकारतर्फे बाजू मांडताना भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी सांगितले की, जन्मस्थानाबाबतच्या या तफावतींचा परिणाम त्यांच्या भारतीय नागरिकत्वावर होऊ शकतो. केंद्र सरकारने गुरुवारी सांगितले की सौरभ दास यांच्या विरोधात नोटीस जारी करण्यात आली आहे. दुसरीकडे, सीजेपी नेत्याच्या वकिलांनी म्हटले आहे की, त्यांना या 'लूक-आउट नोटीस'बद्दल कोणतीही माहिती नाही. न्यायालयाने सरकारला दास यांच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
Saurav Das travel matter | Delhi High Court sought a response from the Central Government on the petition moved by CJP leader Saurav Das. The date fixed for hearing is December 9. Das was stopped at IGI Airport from travelling to London on Monday Night A notice has been issued to the Regional Passport Officer and the Ministry of External Affairs for the next date.
— ANI (@ANI) November 26, 2026
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








