LIVE UPDATES

खून प्रकरणातील आरोपीस न्यायालयीन कोठडी

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: November 10, 2025 21:30 PM
views 588  views

कणकवली : बेंगळूर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी (५३) यांच्या खूनप्रकरणी पोलीस कोठडीत असलेलला पाचवा संशयित वर्धन के. एन (२०, रा. बेंगळूर) याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याआधी चारही संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यावेळी अटक करण्यात आलेल्या पाचव्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. सोमवारी पाचवा संशयित वर्धन के. एन यांची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.