LIVE UPDATES

मांगराच्या कोपऱ्यात बेकायदेशीर दारूसाठा

एकाला अटक
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 16, 2026 20:27 PM
views 34  views

 कुडाळ पोलिसांची कारवाई

​कुडाळ : कुडाळ पोलीस ठाण्याच्या पथकाने मंगळवारी, १६ जून रोजी दुपारी वाडोस येथे छापा टाकून ३३,६०० रुपये किमतीचा गोवा बनावटीचा बेकायदेशीर दारूसाठा जप्त केला. याप्रकरणी भिकाजी विष्णू बागवे (वय ५८, रा. माणगाव बेनवाडी, ता. कुडाळ) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

​वाडोस येथील ग्रामपंचायत घर क्रमांक ८६० च्या बाजूला असलेल्या मांगराच्या कोपऱ्यात बेकायदेशीर दारूसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दुपारी १२:३० वाजता टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी १२,४८० रुपये किमतीच्या 'रोमानोव्ह व्होडका'च्या ४८ बाटल्या आणि २१,१२० रुपये किमतीचे 'किंगफिशर स्ट्रॉंग बिअर'चे ९६ टीन असा एकूण ३३,६०० रुपयांचा विनापरवाना माल जप्त केला.

​याप्रकरणी पो.हे.कॉ. प्रमोद काळसेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २१८/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि जे. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोफौ भिसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.