
कणकवली : संपूर्ण गाव होळीच्या रंगोत्सवात रंगला असताना खारेपाटण येथील पुरुषोत्तम शेट्ये यांच्या कुटुंबीयांवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे महाराष्ट्र राज्य परिवहन मध्ये चालक म्हणून कार्यरत असलेले पुरुषोत्तम शेट्ये यांचा मुलगा ऋतुपर्ण शेट्ये व मुलगी तनिषा शेट्ये यांचा भीषण अपघात होऊन तनिषा शेट्ये (वय 18) ही जागीच ठार झाली असून तिचा भाऊ ऋतुपर्ण शेट्ये हा गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की खारेपाटण रामेश्वर नगर येथील रहिवास असलेले व एसटी महामंडळामध्ये चालक म्हणून कार्यरत असलेले पुरुषोत्तम उर्फ नाना शेट्ये यांना तळेरे येथून घेऊन येण्यासाठी त्यांचा मुलगा ऋतुपर्ण पुरुषोत्तम शेट्ये (वय 23) व त्यांची मुलगी तनिषा पुरुषोत्तम शेट्ये (वय 18) हे दोघेही त्यांच्या जवळील जुन्या मॉडेलची ॲम्बेसिडर कार घेऊन तरळेच्या दिशेने निघाले होते नडगीवे येथील धुरीभाटालेवाडी बस थांब्याजवळ येताच गाडीवरील नियंत्रण सुटल्याने या बस थांब्याच्या साईडला उभ्या असलेल्या भारत बेंज कंपनीच्या ट्रकला भरधाव वेगाने येऊन मागून धडक दिली. आंबेसेडर कार ऋतुपर्ण शेट्ये हा चालवत होता महामार्गावर नडगिवे येथे अपघात स्थळी तात्काळ ग्रामस्थांनी धाव घेऊन गंभीर जखमी असलेल्या ऋतुपर्ण याला पुढील उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले व त्यानंतर उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आल्याचे समजते त्याच्यासोबत असलेली त्याची बहीण तनिषा ही जागीच ठार झाली असून ग्रामस्थांच्या मदतीने खारेपाटण दूरक्षेत्र चे पोलीस हवालदार श्री देसाई, श्री राजू गुणीजन यांच्या सहकार्याने तनिषा हिचा मृतदेह बाहेर काढून खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शवागृहामध्ये ठेवण्यात आला आहे.
मंगळवारी सकाळपासूनच खारेपाटण येथे होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात होता परंपरेनुसार खारेपाट्यांच्या होळी उत्सवामध्ये शेटे कुटुंबाची प्रमुख भूमिका असते अपघाता जखमी झालेला ऋतुपर्ण हा सुद्धा सकाळपासूनच य होळी उत्सवामध्ये सहभागी झाला होता सोशल मीडियाच्या व्हिडिओ मधून ऋतूपूर्ण होळी उत्सवामध्ये निशाण घेऊन मोठ्या आनंदाने सहभागी झाल्याचे दिसत आहे. या दरम्यानच ऋतुपर्ण याचे वडील पुरुषोत्तम शेठ ये हे तरळे येथे आल्याने ऋतुपर्ण व त्याची बहीण तनिषा हे दोघेही त्यांना घेऊन येण्यासाठी तरळे येथे जात असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याचे समजते या अपघाताने खारेपाटण परिसरावर शोककळा पसरली असून ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर तनिषा हिचा झालेला मृत्यू हा दुःखदायक असल्याचे सांगण्यात येते.
अपघात घडल्यानंतर खारेपाटण पोलिसांसहित कणकवली पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. याच दरम्यान जिल्हा परिषद माजी सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार तसेच नवनिर्वाचित जि. प. सदस्य प्राची इस्वलकर, पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव, सामाजिक कार्यकर्ते संकेत शेटये, महेश कोळसुलकर, भाऊ राणे, राजेंद्र चिके या सर्वांनी अपघात स्थळी धाव घेऊन मदतीचा हात दिला.












