LIVE UPDATES

गोवा बिचोलीममध्ये बाप लेकाचा संशयास्पद मृत्यू

मृत संजय म्हापसेकर मूळ कणकवलीचे
Edited by: संदीप देसाई
Published on: March 16, 2026 23:14 PM
views 238  views

डिचोली :गोवा बिचोलीम येथे वडील संजय म्हापसेकर व मुलगा संचीत म्हापसेकर यांचा एकाचवेळी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान घटनास्थळी सुमारे १२ पानी एक पत्र आढळून आलं आहे.

संजय म्हापसेकर हे बिचोलीम भाजप मंडळाचे विद्यमान सरचिटणीस असून ते मूळचे कणकवली येथील असल्याची माहितीही पुढे आली आहे.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.