
देवगड : देवगड येथे पर्यटनासाठी आलेल्या गोव्यातील दोन पर्यटकांनी एका लॉजवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. ही घटना दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक महिला व एक पुरुष यांनी एकाच दोरीला दोन्ही बाजूंनी गळफास घेतल्याचे सांगितले आहे. नेमकी आत्महत्या किती वाजता आणि का केली हे माहीत नसलं तरी दुपारी बाराच्या सुमारास दरवाजा उघडत नसल्याने बेल वाजवण्यात आली व कोणीच दरवाजा उघडला नसल्याने खिडकीतून पाहिले असता हा प्रकार उगडकीस आला आहे. घटनेची माहिती मिळतात अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, यांनी घटनास्थळी भेट दिली व घटनेची माहिती जाणून घेतली. यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव देवगड पोलीस निरीक्षक भालेराव उपस्थित होते. अधिक तपास देवगड पोलीस करत आहेत.













