
मुंबई : पुण्यातील भोर तालुक्यामधील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. आरोपी भीमराव कांबळे याने चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. पुणे विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवले आहे. 1 मे 2026 रोजी आरोपीने हा क्रूर गुन्हा केला होता. याचे सीसीटीव्ही फुटेज देखील पुढे आले. ज्यात आरोपी भीमराव कांबळे हा चिमुकलीला हाताल धरून घेऊन जाताना स्पष्ट दिसले. आरोपीने आपला गुन्हा देखील मान्य केला. त्याच्या कुटुंबियांनी देखील त्याला कडक शासन व्हावे, अशी मागणी केली.
आरोपीने खाऊ देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला होता. चिमुकलीचा शेणाच्या ढिगाऱ्यात मृतदेह लपवला होता. सीसीटीव्ही आधारे आरोपी भीमराव कांबळे याला पकडण्यात आले होते. कोर्टाने मागच्या सुनावणीत भीमराव कांबळे याला दोषी ठरवले. मात्र, त्याचा निकाल 29 जून रोजी राखीव ठेवला. अखेर या प्रकरणातील निकाल पुढे आला आहे. कोर्टाने आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. दोन्ही बाजूचा निकाल कोर्टाने ऐकून घेतला, असल्याचे न्यायालयाने म्हटले.
यादरम्यान न्यायाधीशांनी घटनांचा दाखला दिला. घटना किती जास्त क्रूर आहे, हे समजून घ्यावे लागेल असे न्यायाधिशांनी सुनावणीदरम्यान म्हटले. यादरम्यान कोर्टाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त बघायला मिळत आहे.














