LIVE UPDATES

गोवा बनावटीची दारू आढळल्याबाबत गुन्हा

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 28, 2026 18:47 PM
views 412  views

कणकवली : गैर कायदा बिगर परवाना गोवा बनावटीची दारू बाळगलेल्या स्थितीत आढळल्या प्रकरणी भूषण विष्णू कोथिंबीरे (वय 43, रा. फोंडाघाट - बाजारपेठ) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने फोंडाघाट बाजारपेठ येथील एका जनरल स्टोअरच्या पाठीमागील खोलीत सोमवारी रात्री ९.३५ वा. सुमारास केली. यामध्ये ६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबतची फिर्याद एलसीबीचे पोलीस आशिष गंगावणे यांनी दिली.