
कणकवली : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करताना आढळल्या प्रकरणी मारुती दशरथ ठाकूर (५५, रा. नेरुळ - कुडाळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे कारवाई रत्नागिरी रेल्वे सुरक्षा बलाची (आरपीएफ) अपराध शाखा व कणकवली रेल्वे सुरक्षा बल यांनी एकत्रितरित्या मंगळवारी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास कुडाळ रेल्वेस्थानक येथे केली केली.
संशयित मारुती ठाकूर हा कुडाळ रेल्वे स्टेशन येथील आरक्षण केंद्रावर सातत्याने येत असे याबाबत आरपीएफच्या पथकाला संशय आल्याने पथकाने रत्नागिरी आरपीएफ येथील अपराध शाखेला कळवले. त्यानुसार रत्नागिरी आरपीएफची अपराध शाखा व कणकवली आरपीएफची टीम यांनी एकत्रितरित्या कुडाळ रेल्वे स्टेशन गाठले. तेथील तपासणीत मारुती ठाकूर हा काळाबाजार करण्यासाठी अधिकची तिकिटे घेत होता, अशी बाब निष्पन्न झाली. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास आरपीएफचे निरीक्षक राजेश सुरवाडे करीत आहेत.













