LIVE UPDATES

BREAKING ; मुकादामानेच केलाय बांधकाम व्यवसायिकाचा खून

पोलिसांकडून कसून चौकशी
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 27, 2026 18:08 PM
views 2545  views

मुकादम - सुशांत गेले होते शिकारीला ; खुनाचं कारण अद्यापही अस्पष्ट 

कणकवली : कणकवलीतील प्रतिथयश बांधकाम व्यवसायिक सुशांत दळवी यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी गतिमान हालचाली करत सुशांत यांचा मुकादम अमर सत्यवान कदम (19 ओरोस - डोंगरेवाडी) याला ताब्यात घेतले आहे. सद्यस्थितीत त्याची कसून चौकशी सुरू आहे.

सुशांत व अमर हे दोघे गुरुवारी रात्री शिकारीसाठी गेले होते. त्याचवेळी काही कारणास्तव अमर यांनी सुशांत यांच्यावर गोळी झाडली, असे पोलीस तपासात स्पष्ट होत आहे. मात्र अमर याने सुशांत यांचा खून का केला हे कारण अद्यापही समोर येऊ शकलेले नाही.