LIVE UPDATES

समुद्रकिनारी आढळला 25 वर्षीय अनोळखी युवतीचा मृतदेह

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 23, 2026 11:51 AM
views 850  views

देवगड : अनोळखी २५ वर्षीय युवतीचा मृतदेह सापडल्याने देवगड पडवणे येथे एकच खळबळ उडाली आहे. २१ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह पडवणे येथीलसमुदकिनाऱ्यावर आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

पोलिसांन कडून मिळालेल्या माहितीवरून पडवणे येथील समुद्रकिनारी एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती तेथील शैलेश लवू चौगुले यांनी गावचे पोलीस पाटील समृद्धी समीर परकर यांना फोनद्वारे दिली. ही माहिती पोलीस पाटील यांच्यामार्फत देवगड पोलीस ठाण्याला मिळाल्यानंतर देवगडचे पोलीस निरीक्षक शाम बुवा, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे, हवालदार आशिष कदम यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.

या महिलेचे वय सुमारे २५ वर्षे असून उंची साडेचार फूट आहे.तसेच तिचे केस बांधलेल्या अवस्थेत होते. अंगात गुलाबी रंगाचा पूर्ण हाताचा टॉप व निळसर रंगाची जीन्स पॅण्ट होती. पायात जांभळ्या पांढऱ्या रंगाचे बूट होते.या घटनेची फिर्याद पोलीस पाटील समृद्धी परकर (३३, रा. पडवणे) यांनी दिली आहे, अशी माहिती देवगड पोलिसांकडून मिळाली. मात्र अनोळखी मृत महिलेबाबत कोणतीही माहिती असल्यास देवगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी देवगड पोलिसांन कडून करण्यात आले आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे यांच्याकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.