घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

पोलीसांत अकस्मित मृत्यूची नोंद
Edited by: दिपेश परब
Published on: June 21, 2025 21:30 PM
views 489  views

वेंगुर्ले : उभादांडा - कांबळीवाडी येथील रहिवासी संतोष विष्णू हरमलकर (५३) याचा मृतदेहू, रहाते घरांत दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत व कुजलेल्या परीस्थितीत आढळून आला. याबाबत वेंगुर्ले पोलीसांत अकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.

उभादांडा-कांबळीवाडी येथील रहिवासी संतोष विष्णू हरमलकर (५३) हे दि १९ जून रोजी सायंकाळी 6 ते दि २१ जून सकाळी 11.15 वाजेपर्यंत कोणालाही दिसले नव्हते. शनिवारी ते रहात असलेल्या घरांतून कुजण्याची दुर्गंधी त्या भागांत येऊ लागल्याने स्थानिक नागरीकांनी याबाबत पोलीस पाटील सायली पेडणेकर यांना कळविले. त्यानुसार पोलीस पाटील यांना वेंगुर्ले पोलीस ठाण्याला आणि संतोष विष्णू हरमलकर यांचा भाऊ यशवंत विष्णू हरमलकर कळविले. पोलीस व यशवंत हरमलकर आल्यानंतर त्या घराचे दार उघडण्यात आले. तेव्हा संतोष हरमलकर यांचा मृतदेह गळफास लटकलेल्या मृत अवस्थेत व कुजलेला आढळून आला.

याबाबतची खबर यशवंत विष्णू हरमलकर यांनी पोलीसांत दिली. त्यानुसार पोलीस पंचनामा व उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेद करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल योगेश राऊळ हे करीत आहेत.