शिरोड्यात ७ कोटींची ब्लु व्हेल माश्याची उलटी जप्त

वनविभागाची मोठी कारवाई ; ४ आरोपींना अटक
Edited by: दिपेश परब
Published on: April 17, 2026 09:01 AM
views 612  views

वेंगुर्ले: शिरोडा परिसरामध्ये वन्यप्राणी ब्लु व्हेल प्राण्याचा पदार्थ उलटी (अंबरग्रीस) विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर रित्या जवळ बाळगल्याप्रकरणी वनविभागाने शिरोडा येथे सापळा रचून धाड टाकली. यात ९.१२० की. ग्रॅम वजनाचे सुमारे ७ कोटी रुपये किमतीचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले आहे. 

    या प्रकरणी शिरोडा परबगाव येथील  रणजित रामचंद्र नायर (४०), गुरुनाथ नाईक (७०), विभव आडारकर (३५) व निलेश मनोहर पांडजी (३३) राहणार रेडी यांना यांना संशयीत आरोपी म्हणून अटक करण्यात आलेली आहे. 

     शिरोडा परिससामध्ये वन्यप्राणी ब्लु व्हेल प्राण्याचा पदार्थ उलटी (अंबरग्रीस) बेकायेदशिर रित्या जवळ बाळगुन त्याची विक्री करणार असल्याची माहिती सावंतवाडी फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल  सचिन शिडतुरे यांना मिळल्यावरुन गुरुवारी १६ एप्रिल रोजी सावंतवाडी उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, कोल्हापूर दक्षता विभागीय वन अधिकारी संजय वाघमोडे, सावंतवाडी सहाय्यक वनरक्षक डॉ. सुनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करुन तसेच काही टिम तयार करण्यात आल्या. वनक्षेत्रपाल फिरते पथक व वनपरिक्षेत्र कुडाळ मधील स्टाप समवेत बनावट ग्राहक तयार करुन सापळा रचण्यात आला. त्यानुसार सायंकाळी ७ च्या सुमारास वन्यप्राणी ब्लु व्हेलची उलटी बेकायदेशिर रित्या बाळगुले प्रकरणी वन गुन्हयाची कारवाई करुन संशयित आरोपींच्या ताब्यातुन 9.120 कि.ग्रॅ. बजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आलेल आहे. सदरचे अंबरग्रीस आरोपी यांना सुमारे ७ कोटी रुपये किंमतीस विक्री करायची होती.

    ब्लू व्हेल माशाची उलटीस आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठी मागणी व किंमत असल्याने पैशांच्या लोभापायी अशा स्वरुपाचे वनगुन्हे सदया उघडकिस येत आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे अंबरग्रीस अथवा वन्यप्राण्याचे मृगयाचिन्ह, उपपदार्थ आढळून आल्यास त्याबाबत तात्काळ लगतचे वनाधिकारी यांना कळविण्यात यावे असे आवाहन वनक्षेत्रपाल फिरते पथक सावंतवाडी यांनी केले आहे.

    सदरची कारवाई सचिन शिडतुरे वनक्षेत्रपाल फिरते पथक, अमित कटके, वनक्षेत्रपाल संशोधन दोडामार्ग, सावळा कांबळे, वनपाल मठ, महेश पाटील, वनपाल फिरते पथक, ब्रम्हकुमार भोजने, वनरक्षक तुळस, संग्राम पाटील, वनरक्षक आंबोली, अनिकेत माने, वनरक्षक माणगाव, रविंद्र पाटील, वनरक्षक फिरते पथक, रिषीका होले, वनरक्षक फिरते पथक, नितीन सावंत, चालक वनविभाग यांनी यशस्वीरित्या पार पाडली.