
बेगुसराय : बिहारमध्ये महिला डॉक्टरवर ॲसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी रात्री बेगुसराय जिल्ह्यात बायपास ते हर्रखला जोडणाऱ्या रस्त्यावरून घरी जात असताना एका विकृत हल्लेखोराने या महिला डॉक्टरवर ॲसिड फेकले. या हल्ल्यात डॉक्टर जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टर महिलेवर ॲसिड फेकल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक (एसपी) मनीष यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. दरम्यान, डॉक्टर यांच्या हाताला आणि शरीराच्या काही भागांना किरकोळ भाजले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
घटनेबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, या प्रकरणातील मुख्य संशयित गौतम झा याला अटक करण्यात आली आहे. तो दलसिंगसराय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामपूर जलालपूर गावचा रहिवासी आहे. पीडितेने नगर पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर सतीश कुमार हिमांशू यांना सांगितले की, सोमवारी रात्री ९:२५ वाजता डॉक्टर महिला एका रुग्णालयातील आपली ड्युटी संपवून ती हर्रख येथील आपल्या घरी परतत होती.
बायपास ते हर्रखला जाणाऱ्या रस्त्यावर ती गाडीतून खाली उतरली असता, तिथे दबा धरून बसलेल्या गौतम झाने तिच्यावर ॲसिड फेकले. यापूर्वी बछवारा येथील एका रुग्णालयात काम करत असतानाही गौतमने या डॉक्टरला त्रास दिला होता. पोलीस आता जुने प्रकरण, आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक संबंध यांसारख्या विविध पैलूंतून या प्रकरणाचा तपास करत आहेत. सोमवारी रात्री ॲसिड हल्ल्याची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक मनीष यांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि पीडितेची भेट घेऊन घटनेचा सविस्तर तपशील जाणून घेतला.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










