LIVE UPDATES

आरोंदा नदीपात्रात अंधारात वाळू उपसा

सर्जिकल स्ट्राईकनंतरही माफियांचा सुळसुळाट
Edited by: विनायक गांवस
Published on: April 18, 2026 23:15 PM
views 707  views

सावंतवाडी : आरोंदा नदी पात्रात किरणपाणी ब्रीज जवळ अनधिकृत वाळू उपसा होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या जमिनींनी धोका निर्माण झाल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारींची दखल घेत नुकतीच सर्जिकल स्ट्राईक करत एका रात्रीत १५ वाहनांवर कारवाई केलेली असताना सावंतवाडीतील आरोंदा येथे रात्रीच्या अंधारात वाळू माफियांकडून उपसा सुरू आहे. २४ तास आदी झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे अवैध वाळू उपसाला आळा बसण आवश्यक असताना आरोंदा नदी पात्रात अनधिकृत वाळू उपसा होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या भुमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.