LIVE UPDATES

गोवा बनावटीच्या अवैध मद्य साठ्यावर तोरसोळेत कारवाई

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 04, 2026 12:03 PM
views 466  views

देवगड  : देवगड तालुक्यातील तोरसोळे पाळेकरवाडी येथे गोवा बनावटीचाअवैध मद्य साठ्यावर कारवाई करण्यात आली असून या घटनेतील संशयितआरोपी सतीश गंगाराम परब (५०) यांच्याकडील स्थानिक गुन्हा अन्वेक्षण शाखा सिंधुदुर्ग यांच्या कडून करण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे अवैध गोवा बनावटीची रु ५६२५/किमतीचा मद्य साठा मुद्देमाला सहित जप्त करण्यात आला आहे. यातील संशयित आरोपी सतीश गंगाराम परब (५०)यांचेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ ई नुसार कारवाई करण्यात आली आहे.ही कारवाई ३ एप्रिल रोजी दु. १२.४० च्या मानाने करण्यात आली.

हस्तगत केलेल्या मुद्देमालात रु २७५०/-किमतीची १८० मिलीच्या बॉबज लेमन व्होडका २२ बाटल्या, आणि हनिब्लेंड प्युअर ब्रँडीच्या रु २८७५/-किमतीच्या २३ बाटल्या एकूण रु ५६२५/- समावेश आहे. हेड कॉनस्टेबल गणपती गावडे यांच्या कडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.