
देवगड : कर्नाटका येथील मलपी नौकेवर देवगड सागरी हद्दीत मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली असून दि. १० मार्च २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गिर्ये समोरील सागरी क्षेत्रात गस्त घालनारया या कर्नाटककी मलपी ‘श्री सानिध्या’ नावाच्या ट्रॉलिंग नौकेवर धडक कारवाई करण्यात आली.या वेळी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक टुकरुल, खवले, . फाटक, बांधकर आणि सावजी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. नितेश राणे यांच्या दिशानिर्देशानुसार विभाग अवैध परप्रांतीय मासेमारीविरोधात कठोर भूमिका घेत असून यापूर्वीही अनेक नौका जप्त करून मोठा दंड वसूल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ (सुधारित २०२१) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. देवगड परवाना अधिकारी तथा अंमलबजावणी अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील गस्ती पथकाने ही यशस्वी मोहीम राबवली. सागरी हद्दीत अंदाजे 17 ते 18 फॅदम (वावा) खोलीवर ट्रॉलिंग करताना नौका आढळली. पथक जवळ येताच नौकेने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पथकाने वेगवान पाठलाग करून तिला यावेळी कसोशीने ताब्यात घेत नौका जप्त करण्यात आली असून, त्यातील मासळीचा लिलाव सुरू आहे.
जप्त नौकेची मुख्य माहिती:
• नौकेचे नाव: श्री. सानिध्या
• नोंदणी क्रमांक: IND-KA-02-MM-5692
• मालक: श्री. गणेश लोकू बंगेरा (राहणार: कोजारकुली,गरडीमजल, केलारलाबेट मलप्पी, कर्नाटक)
• परवाना: फक्त कर्नाटक राज्याच्या जलधीक्षेत्रासाठी
या नौकेवर तांडेलसह एकूण आठ खलाशी होते. सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून, नौका देवगड बंदरात सुरक्षित आणण्यात आली आहे. जप्त मासळीचा लिलाव प्रक्रियेत असून, मिळणारी रक्कम शासकीय खजिन्यात जमा होईल. प्रकरणाचा सविस्तर अहवाल सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्याकडे सादर केला जाईल. सुनावणीनंतर नौकामालक आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई होणार आहे.














