LIVE UPDATES

सुशांत दळवी खून प्रकरण ; आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 28, 2026 17:40 PM
views 981  views

कणकवली : युवा बांधकाम व्यवसायिक सुशांत दळवी यांच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी अमर कदम (१९, रा. ओरोस) याला आज शनिवारी दुपारनंतर ओरोस येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. स्वाती पाटील (अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वर्ग ३) यांनी त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकारी पक्षातर्फे ऍड. सौ. एस. वाय. गोबाडे यांनी काम पाहिले.