LIVE UPDATES

खळबळजनक | तिलारी घाटातील झुडपात सापडला महिलेचा सडलेला मृतदेह

Edited by: लवू परब
Published on: May 29, 2026 21:26 PM
views 72  views

दोडामार्ग : दोडामार्ग बेळगाव कोल्हापूर जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटात वीज निर्मिती जलवाहिनीकडे जाणाऱ्या रस्ताच्या बाजूला  झाडी झुडपात एका ३५ वर्षीय अनोळखी महिलेचा सडलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर महिलेचा घातपात करून मृतदेह टाकला असावा अशी शक्यता काही जण या ठिकाणी वर्तवत आहेत याबात चंदगड पोलिसांनी घटना स्थळी पंचनाम करून मृतदेह ताब्यात घेऊन अधिक तपास करत आहेत.

    याबात अधिक माहिती अशिकी तिलारी विजनिर्मिती जलवाहिनी कडे जाणाऱ्या रस्त्याने काहीजण जात होते. ते जातं असताना त्यांना कुजलेला वास आला त्यावेळी त्यांनी लगतच्या झाडी झूडपात शोधाशोध घेतला असता त्यांना एक कुजलेला मृतदेह निदर्शनास आला. हि माहिती कळसगादे पोलिसपाटील सदानंद विठू सुतार यांना समजताचा त्यांनी चंदगड पोलिसांना माहिती दिली. चंदगड पोलीस घटना स्थळी दाखल होऊन पंचनामा केला आणि सदर मृतदेह एका 30/35 वर्षीय महिलेचा असल्याचा अंदाज वर्तवला. 

   तिलारी घाटात या अगोदर काही वर्षा पूर्वी देखील खुन करून दोन महिला तसेच चालक वाहक यांचे मृतदेह सांगाडे सापडले होते. हा घाट धोकादायक तसेच खोल दरी असल्यामुळे गुन्हेगार घातपात करून मृतदेह या घाटात किंवा आड वाटेला टाकतात. असाच हा प्रकार घडला असावा असा अंदाज तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी वर्तवला आहे.

    तिलारी घाटात महिलेचा मृतदेह आढळून आला हे समजताच चंदगड पोलीस उप  निरीक्षक आकाश भिंगारदिवे सर्व टीम सह तिलारी घाटात दाखल झाले. सदर महिलेचे वय ३० ते ३५ वर्षे असावे असा अंदाज आहे. तिच्या अंगावर मोर पिसी सोनेरी साडी, लाल सोनेरी ब्लाऊज, तसेच पायात पैजण जोडे आहेत मृतदेह सडला आहे यामुळे ओळख पटणे कठीण झाले आहे. या ठिकाणी मृतदेह टाकला यामुळे घातपात शक्यता वर्तवली जात आहे. असे त्यांनी सांगितले तसेच चंदगड पोलिस ठाणे हद्दीत महिला कुठे बेपत्ता आहे का? याबाबत सर्वञ माहिती काढायला सुरुवात केली आहे.  

तरी चंदगड पोलिसांसमोर खुनाचा तपास करणे मोठं आवाहन आहे. कर्नाटक राज्यातील ही महिला असण्याची शक्यता आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यू बाबत माहिती मिळणार आहे.