LIVE UPDATES

15 किलोच्या तांब्याच्या हंड्यात शिजत होता भात

चोरट्याने हंडाच नेला पळवून
Edited by: लवू परब
Published on: March 30, 2026 17:33 PM
views 414  views

दोडामार्ग : गिरोडे येथील संतोष विष्णू गवस यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने चक्क चुलीवर भात शिजत ठेवलेला १५ किलोचा तांब्याचा हंडा चोरी केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गवस यांनी रविवारी रात्री तांब्याच्या हंड्यात भात शिजत ठेवला होता. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी हंड्यातील शिजत असलेला भात बाहेर ओतून हंडा चोरून नेला. ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.