LIVE UPDATES

दांडी परिसरात अवैध दारू विक्रीवर छापा

५ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: November 01, 2026 02:55 PM
views 48  views

मालवण : दांडी परिसरात अवैध दारू विक्रीवर पोलिसांनी काल रात्री टाकलेल्या छाप्यात गोवा बनावटीच्या दारूचे एकूण ८० बॉक्स जप्त करण्यात आले असून, जप्त केलेल्या या मुद्देमालाची एकूण किंमत ५ लाख ३८ हजार रुपये आहे. या प्रकरणी ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहीकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक  गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक श्री.भगत, पोलीस उपनिरीक्षक अभिजित भोसले, पोलीस हवालदार सुहास पांचाळ आणि पोलीस हवालदार सुप्रिया पवार यांच्या पथकाने ही कारवाई केळी. अवैध दारू धंद्यांविरुद्ध पोलिसांनी हाती घेतलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरात अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.