LIVE UPDATES

बांधकाम व्यावसायिक कैलास साटेलकर यांना मातृशोक

सुरेखा साटेलकर यांचे निधन
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: November 01, 2026 02:45 PM
views 60  views

कणकवली : कणकवली शहरातील साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक कैलास साटेलकर यांच्या आई सुरेखा सुरेश साटेलकर ( वय 65, रा. तेर्सेबांबर्डे , साटेलकरवाडी ) यांचे गोवा  बांबुळी येथे वैद्यकीय उपचारादरम्यान शनिवार 31 ऑक्टोबर रोजी दुपारी निधन झाले. सुरेखा यांच्यावर मागील काही दिवस रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर तेर्सेबांबर्डे येथील स्मशानभूमीत शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे.