LIVE UPDATES

पान टपरी सील ; छापा मारून 4 हजारांचा गुटखा जप्त

Edited by: विनायक गांवस
Published on: May 30, 2026 00:26 AM
views 30  views

सावंतवाडी : शहरात अन्न सुरक्षा अधिकारी सिंधुदुर्ग, अन्न व ओषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांनी सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोती तलाव जवळ असणाऱ्या पान टपरीवर छापा मारत ती सील केली. छापा मारून 4 हजार 225 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, यानंतर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अंमली पदार्थांच सेवन अन् विक्री बघता यावर प्रशासनाकडून कधी कारवाई होणार ? याकडेही लक्ष लागून राहिले आहे

अन्न सुरक्षा अधिकारी सिंधुदुर्ग, अन्न व ओषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांनी सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोती तलावा जवळ असणारी पान टपरी सील केली आहे. छापा मारून 4 हजार 225 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.महादेव कळणेकर व दत्तात्रय कळणेकर यांच्या पान बिडी स्टॉल वर छापा मारून ही कारवाई करत गुटखा जप्त करण्यात आला आहे. याबाबत पंचनामा करून सर्व माल ताब्यात घेतला असून पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. रीतसर पूर्तता केल्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.