सिंधू रनर्स गाजवली टाटा मुंबई मॅरेथॉन !

Edited by: ब्युरो
Published on: January 24, 2024 06:36 AM
views 168  views

मुंबई : जगभरात प्रतिष्ठेची मानली जाणारी आणि धावपळीच्या जीवनात मुंबईकरांना आणि जगाला सुदृढ आरोग्याचा मार्ग दाखविणारी ‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२४’ ही स्पर्धा रविवार २१ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती. ‘हर दिल मुंबई’चा नारा देत हजारो मुंबईकर आणि जगभरातील धावपटू यात सहभागी झाले होते. या धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी ध्वनीक्षेपकावर गाणी ही वाजविण्यात आली. तसेच, मुंबई पोलीस बॅण्डने ही सादरीकरण केले.


 जगभरात पाच महत्वाच्या मॅरेथॉन आयोजन करणाऱ्या टाटा ग्रुपची मुंबई मॅरेथॉन म्हणजे रनरचा कुंभमेळा मनाला जातो. त्याचा प्रत्यय म्हणजे यावर्षी ५९००० रनर टाटा मॅरेथॉन धावले. त्यांना सहायक म्हणून जवळपास ३००० पोलीस, ४५० वैद्यकीय टीम असा फोजफाटा तैनात होता.  मुंबई मॅरेथॉनचे यंदा १९ वे वर्षहोते. पहाटेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून यंदाच्या मॅरेथॉनला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आदी राजकीय मंडळीनी हिरवा झेंडा दाखवला. 


मागील वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सिंधू रनर टीमकडून १२ धावक ४२ .२ किलोमीटर आणि २ धावक २ १ . १ किलोमीटर अंतर धावण्यासाठी सामील झाले होते. जागतिक दर्जाच्या यामॅरेथॉनमध्ये प्रत्येकाच कलहा आपला उत्कृष्ट्र वेळ नोंदवण्याचा असतॊ. याचे कारण म्हणजे मुबई मॅरेथॉनचा मार्ग हा आझाद मैदान, छत्रपती शिवाजी टर्मिनलकडून सुरु होऊन वरळी सीफेस, वांद्रे वरळी सीलिंक, माहीम, परत वांद्रे, प्रभादेवी, दादरकडून वानखेडे स्टेडियमकडून छत्रपती शिवाजी टर्मिनल असा आहे. म्हणूनच प्रत्येक रनर आपला उत्कृष्ट्र वेळ नोंदवण्याचा प्रयत्न करतो.  यामॅरेथॉनमध्ये पण सिंधू रनर टीमची कामगिरी वखडण्याजोगी राहिली. तब्बल ७ धावकांनी ४ तासाच्या आतली वेळ नोंदवली. प्रत्येक धवकाची वेळखालीलप्रमाणे : १. प्रसाद कोरगावकर ४२ . १९५ किलोमीटर : ३ तास १६ मिनिट २. पांडुरंग कदम ४२ . १९५ किलोमीटर : ३ तास ३२ मिनिट ३. नरेश मांडावकर ४२ . १९५ किलोमीटर : ३ तास ३६ मिनिट ४. तानाजी पाटील ४२.१९५किलोमीटर : ३ तास ४३ मिनिट ५. डॉ. सुभाष पाटील ४२ . १९५ किलोमीटर : ३ तास ४८ मिनिट ६. ओंकार पराडकर ४२ . १९५ किलोमीटर : ३ तास ५६ मिनिट ७. भूषण बान्देलकर ४२ . १९५ किलोमीटर : ३ तास ५९ मिनिट ८. निलेश राहणे ४२ . १९५ किलोमीटर : ५ तास ३ मिनिट ९. हेमंत जाधव ४२ . १९५ किलोमीटर : ५ तास ७ मिनिट १०. संतोष पेडणेकर ४२ . १९५ किलोमीटर : ५ तास ४४ मिनिट ११. निलेश मळीक ४२ . १९५ किलोमीटर : ६ तास ४७ मिनिट १२. नितीन मळीक ४२ . १९५ किलोमीटर : ६तास ४७ मिनिट १३. भूषण साळगावकर २१ . १ किलोमीटर : २ तास १४. प्रकाश चव्हाण २१ . १ किलोमीटर : २ तास ४३ मिनिट वरील कामगिरीबद्दल या सर्व टीममेंबर्सचे कौतुक होत आहे. 


सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी मुख्याधिकारी जयंत जावडेकर, डॉ शंतनू तेंडुलकर, डॉ अभिजीत वझे, डॉ मिलिंद खानोलकर, डॉ स्नेहल गोवेकर, डॉक्टर्स अससोसिएशन ऑफ सावंतवाडी तसेच सावंतवाडी रिक्षा चालक मालक संघटना, संतोष नाईक (हुमान राईट्स अससोसिएशन अध्यक्ष सिंधुदुर्ग), देवयानी वरसकर कोकणसाद LIVE, सर्व पत्रकार बंधू, डॉ वि. सी. काठाने, डॉ.बाबासाहेब पाटील, प्रसिद्ध कब्बडी प्रशिक्षक जावेद शेख, पखवाज अलंकार महेश सावंत आणि दादा परब, नेमबाजी प्रशिक्षक कांचन उपरकर अश्या सर्व मान्यवरांकडून सिंधू रनर टीमचे कौतुक होत आहे. अशीच कामगिरी सिंधू रनर टीम बजावत राहील यात किंचित मात्र हि शंका नाही.

 अथक प्रयत्न करून सिंधू रनर टीम ला नामवंत इंटरनॅशनल धावकांच्या यादीत आपले नाव करता आले याचा सिंधू रनर्स टीमला अभिमान आहे. कोकण सारख्या कमी साधने, कमी मार्गदर्शन आणि धावणे या खेळाकडे दुर्लक्षित भागात स्वतःच्या जिद्दीने, प्रतिकूल परिस्थिती कष्ट करून त्याने हे यश संपादन केले. या पुढे त्याला योग्य मार्गदर्शक मिळवून, उत्तम ट्रैनिंग देऊन देशाचे प्रतिनिधित्व कसे करता येईल यासाठी सिंधू रनर्स टीम प्रयत्नशील राहील. सिंधू रनर टीमने आतापर्यंत सावंतवाडी १२ तास रन ३ वेळेस, गोवा ते सावंतवाडी १०० किलोमीटर रन २ वेळेस, मालवण ते सावंतवाडी आरमार रन २ वेळेस, २४ तास स्टेडियम रन, हिमालयन खारडुंगला अल्ट्रा रन ७२ किलोमीटर, देहू ते पंढरपूर २६६ किलोमीटर, टाटा अल्ट्रा मॅरेथॉन, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन, पुणे अल्ट्रा मॅरेथॉन,  जम्पिंग गोरिला ट्रेल रन,  लोकमत मॅरेथॉन,  ठाणे हाफ मॅरेथॉन अश्या आणि अनेक रनमध्ये भाग घेऊन आपल्या जिल्याह्याचे नाव जगभरात गाजवले आहे.