
सावंतवाडी : मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन कोकण विभागीय रायफल शूटिंग मुले व मुली स्पर्धा 23 सप्टेंबर 2025 रोजी बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयातील संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीचा विद्यार्थी साईश दिगंबर तळणकर यांने दहा मीटर एअर पिस्तुल या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले. या विद्यार्थ्यांची निवड मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन विभागीय रायफल शुटींग स्पर्धेतील कोकण विभागाच्या संघातून झाली आहे. सदर स्पर्धा मुंबई येथे होणार आहे. त्याच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन राणीसाहेब सौ शुभदा देवी भोंसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखराजे भोंसले, संस्थेचे कार्यकारीणी सदस्य जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एम ए ठाकूर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.सी .ए .नाईक, व महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.













