मंत्री नितेश राणेंनी घेतलं भालचंद्र महाराजांचं दर्शन

भक्तांसह विक्रेत्यांशीह साधला संवाद
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: November 28, 2025 11:41 AM
views 11  views

कणकवली : कणकवली येथील योगीराज परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी निमित्त प. पु.भालचंद्र महाराज समाधी स्थळी पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी दर्शन घेतले. कणकवली मतदारसंघातील सर्वसामान्य जनता सुखी , समृध्द राहो असे गाऱ्हाणे राणे यांनी घातले. यावेळी त्यांनी आश्रमात उपस्थित भक्त, विक्रेत्यांशी संवादही साधला. भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त संस्थानमध्ये २३ ते २७ नोव्हेंबर दरम्यान पुण्यतिथी महोत्सव आयोजित करण्यात आला. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आलेल्या या पुण्यतिथी महोत्सवाची गुरुवारी सांगता झाली. यानिमित्तच पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित राहून समाधीचे दर्शन‌ घेतले. 

यावेळी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे, तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, संस्थानचे अध्यक्ष कामत, व्यवस्थापक विजय केळुस्कर, गजानन उपरकर, संतोष कानडे, राजन परब, राज नलावडे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.