
कणकवली : वागदे - बौद्धवाडी येथील किरण सुनील कदम (27) याचे अल्पशा आजाराने सोमवार, 24 नोव्हेंबर रोजी ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. वागदे गावचे पोलीस पाटील सुनील कदम यांचा तो मुलगा होय.
किरण याने पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. मुंबई महानगर पालिकेत काही महिने त्याने काम केले होते. गेले काही दिवस तो गावीच होता. अल्पशा आजारपणामुळे त्याला रविवारी उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. किरण हा जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून मदतकार्यात नेहमीच सहभागी असायचा. त्याच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहीण, भावोजी असा परिवार आहे.










