स्पोर्ट्स फाउंडेशन क्रीडा स्पर्धेत झियाद शेख प्रथम

Edited by: विनायक गांवस
Published on: November 21, 2025 13:23 PM
views 7  views

सावंतवाडी : स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग द्वारा आयोजित एक किलोमीटर रनिंग क्रीडा प्रकारात बारा वर्षे खालील मुलांच्या वयोगटात सि.जि.शि.प्र.मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीचा विद्यार्थी कु.झियाद शेख याने प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्यास प्रशस्तिपत्र, मेडल व चषक देऊन गौरविण्यात आले.

या यशाबद्दल  सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब  खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक दिलीप देसाई, मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ.सतीश सावंत, मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.