देवगड कोस्टल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान
Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 23, 2025 20:14 PM
views 43  views

देवगड : “देवगड कोस्टल हाफ मॅरेथॉन रन 2025” हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी आणि डॉक्टर फॅटर्निटी क्लब,देवगड यांच्या संयुक्त “दौड आरोग्याची, साद देवगडच्या पर्यटनाची” या घोषवाक्याखाली झालेल्या या मॅरेथॉनमध्ये विविध अंतराच्या स्पर्धांना धावपटूंचा मोठा प्रतिसाद मिळाला.देवगडच्या निसर्गरम्य किनारपट्टीवरून धावण्याचा अद्वितीय अनुभव यावेळी सहभागींना मिळाला. या स्पर्धेचे उद्घाटन डायमंड हॉटेल येथून करण्यात आले. 21, 11 आणि 5 किलोमीटर गटात पुरुष व महिला गटातील धावपटूंनी दमदार कामगिरी बजावली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वितरण करण्यात आले.या स्पर्धेमध्ये विजेते  21 किमी पुरुष गटामधून प्रथम क्रमांक  ओमकार बयकर, द्वितीय  संकेत माचणे, तृतीय ओम उन्हाळकर तर 21 किमी महिला गटामधून प्रथम क्रमांक रेश्मा पांढरे, व्दितीय क्रमांक चंद्रकला सातपुते,तृतीय क्रमांक ॲड.सोनल पालव, 11 किमी पुरुष गटामधून प्रथम क्रमांक  यश शिर्के, व्दितीय क्रमांक रितेश देवळेकर, तृतीय क्रमांक लोचन पाटील, 11 किमी महिला गटामधून प्रथम क्रमांक  मेघा सातपुते, व्दितीय क्रमांक स्वाती व्हानवडे,तृतीय क्रमांक श्रेया अटक यांनी मिळविला. स्पर्धेनंतर विजेत्यांना ट्रॉफी, मेडल, ऑनलाईन प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. स्पर्धेदरम्यान पोलिस प्रशासन, स्वयंसेवक, वैद्यकीय टीम आणि आयोजकांनी उत्कृष्ट व्यवस्था केली.धावपटूंनी अशा उपक्रमांमुळे आरोग्याचे महत्त्व पटते तसेच किनारी देवगड परिसरातील पर्यटनालादेखील चालना मिळते, अशी प्रतिक्रिया दिली. देवगड कोस्टल हाफ मॅरेथॉन 2025 यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व आयोजक व सहकार्यकर्त्यांचे सहभागी धावपटूंनी मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.यावेळी देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीचे अध्यक्ष गौरव पारकर, खजिनदार दयानंद पाटील, श्रीपाद पारकर, हनीफशेठ मेमन,डॉ.किरण पाटणकर,अशोक मुज्जुमले. डॉ.प्रशांत मडाव, डॉ.किरण पाटणकर, डॉ. स्वप्निल शिंगाडे, सचिन मदने, संजीव देसाई, अनुश्री पारकर, प्रविण पोकळे, मनस्वी घारे, विजय बांदिवडेकर, अनिकेत बांदिवडेकर,अनिल गांधी,अनिलकोरगांवकर,अयोध्याप्रसाद गावकर,एकनाथ तेली, रमाकांत आचरेकर,रुपेश खोत आदी रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते व माजी आमदार अजित गोगटे, बाळा खडपे, संदिप साटम, राजा भुजबळ, योगेश चांदोस्कर, प्रियांका साळसकर, तन्वी चांदोस्कर आदी उपस्थित होते.