
नवी दिल्ली : आयसीसीने सप्टेंबर महिन्यातील बेस्ट प्लेअर्सची घोषणा केली आहे. या यादीत दोन भारतीय खेळाडूंची वर्णी लागली आहे. भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघांचा कर्णधार शुभमन गिल याची सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे तर महिलांच्या गटात, स्टार सलामीवीर शफाली वर्माची निवड करण्यात आली आहे. याबाबतची मंगळवारी घोषणा करण्यात आली.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत गिलने पहिल्या दोन सामन्यांत ३३४ धावा केल्या. २७ वर्षीय गिलने भारताचा अभिषेक शर्मा आणि झिम्बाब्वेचा सिकंदर रझा यांना मागे टाकून सप्टेंबरसाठी 'आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ' हा पुरस्कार जिंकला. गिलची पुरस्कार जिंकण्याची ही पाचवी वेळ आहे. शफाली वर्माने श्रीलंकेची कर्णधार चमारी अथापथू आणि भारतीय फिरकीपटू श्री चरणी यांना मागे टाकत बाजी मारली.
A month to remember for our #TeamIndia openers 👏 Congratulations to Shubman Gill and Shafali Verma on being named the ICC Men's and Women's Player of the Month for September, respectively 🤝 @ShubmanGill | @TheShafaliVerma https://t.co/okMCmDgzwv
— BCCI (@BCCI) October 13, 2026
गिलची पुरस्कार जिंकण्याची ही पाचवी वेळ आहे. सप्टेंबर २०२६ पूर्वी, गिलने याआधी जुलै २०२५, फेब्रुवारी २०२५, सप्टेंबर २०२३ आणि जानेवारी २०२३ मध्ये 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कार जिंकला होता. भारताकडून याआधीचा पुरुष पुरस्कार विजेता संजू सॅमसन होता. दरम्यान, २२ वर्षीय शफाली वर्माने दुसऱ्यांदा 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ' हा पुरस्कार पटकावला आहे. तिने याआधी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हा पुरस्कार जिंकला होता. तेव्हा तिने भारताला मायदेशात विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










