LIVE UPDATES

जलसंवर्धनासाठी शिरगांववासीय एकवटले

पालकमंत्री नितेश राणे यांच्या लोक सहभागाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 30, 2026 19:45 PM
views 28  views

देवगड : यावर्षी पाऊस खूपच कमी प्रमाणात पडल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आतापासूनच कच्चे बंधारे बांधून पाणी साठवणे भविष्याची गरज आहे. हे ओळखून जास्तीत जास्त पाणी जमिनीत मूरविण्यासाठी शिरगाव -शेवरे ओहोळावर अडूबांध बांधला.

गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत एक आदर्श सर्वांसमोर ठेवला. अशा पद्धतीचे अजूनही गावात आठ ते दहा बंधारे बांधण्याचा मानसही यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला. यावेळी संदीप साटम, माधव साटम, राजेंद्र शेट्ये, मिलिंद साटम, सुधीर साटम, बापू खरात, मेघना साटम, रेखा शिरोडकर, अनिल घाडी, योगेश तावडे, प्रशांत शिरोडकर, स्वप्नील  वायगणकर, राकेश साटम, ज्ञानेश्वर, स्वप्नील हिंदळेकर, विजय साटम, कदम सर, संतोष तावडे इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.