LIVE UPDATES

जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजारच्या विद्यार्थिनींचे यश

८०० मीटर धावण्यात श्रावणी सावंतचा प्रथम क्रमांक; विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 25, 2026 01:13 PM
views 29  views

देवगड : जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा २०२६-२७ मध्ये महात्मा गांधी विद्यामंदिर, तळेबाजार प्रशालेच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी श्रावणी सावंत हिने ८०० मीटर धावण्याच्या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे तिची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तसेच ४×१०० मीटर रिले या सांघिक धावण्याच्या प्रकारात प्रशालेच्या पूर्वा लाड, श्रावणी लाड, सेजल थोटम आणि आस्था फाटक या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट समन्वय व जिद्दीच्या जोरावर तृतीय क्रमांक मिळवला. या यशामुळे प्रशालेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक अजित कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थाध्यक्ष संदीप तेली, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, खजिनदार संतोष वरेरकर, सचिव कृष्णा साटम तसेच संस्थेच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ यांनीही विद्यार्थिनींचे विशेष कौतुक केले. विद्यार्थिनींच्या या यशामागे त्यांची मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण सराव आणि मार्गदर्शन यांचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

या यशाबद्दल सर्व स्तरांतून विद्यार्थिनींचे अभिनंदन होत असून, विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या कुमारी श्रावणी सावंत हिच्याकडून पुढील स्पर्धेतही उज्ज्वल यशाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


ताजी बातमी

View all

 Kankavli Highway Police appeal to motorists to follow traffic rules and prevent road accidents in Sindhudurg.
“वेगापेक्षा जीवन अनमोल!” हेल्मेट, सीटबेल्टचा वापर करा
October 25, 2026
Florida Shooting Near University Stadium
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये विद्यापीठाजवळ गोळीबार, ६ मुलांसह १२ जण जखमी
October 25, 2026
सावंतवाडीत योगा सेंटर सुरू करण्यासाठी भाजपाचे प्रयत्न
October 25, 2026
जबाबदार लोकप्रतिनिधी हेच ग्रामविकासाचे आधारस्तंभ
October 25, 2026
संबंधित बातम्या

View all

 Pankaj Advani Wins 29th World Title, Defeats Rob Hall in Billiards Final
Pankaj Advani : पंकज अडवाणीने २९ वे विश्वविजेतेपद जिंकून घडवला नवा इतिहास
October 24, 2026
देवगडच्या एस. एच. केळकर महाविद्यालयाची ॲथलेटिक्समध्ये दमदार कामगिरी
October 24, 2026
Tilak Varma celebrates his half-century in India's second T20 match against New Zealand
India vs New Zealand 2nd T20 : तिलक वर्माची फटकेबाजी! भारताचा न्यूझीलंडवर थरारक विजय, मालिकेत २-० आघाडी
October 24, 2026
India Women aim to secure a 2-0 series lead against Zimbabwe Women in the second ODI in Vadodara.
India vs Zimbabwe Women 2nd ODI : मालिकाविजयासाठी भारतीय महिला संघ सज्ज
October 24, 2026