LIVE UPDATES

जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत शेठ म. ग. हायस्कूल द्वितीय

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 26, 2026 10:28 AM
views 93  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : माध्यमिक शिक्षण समिती संचालित जनता विद्यामंदिर, त्रिंबक तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त आयोजनातून पार पडलेल्या जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल, देवगडच्या १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत देवगडच्या संघाने आपल्या कौशल्याची, सांघिक भावनेची आणि जिद्दीची चुणूक दाखवून दिली. खेळाडूंनी केलेल्या मेहनतीला आणि सरावाला या यशाच्या रूपाने योग्य फळ मिळाले आहे.

या यशाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक प्रवीण खडपकर, पर्यवेक्षिका निशा दहिबावकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकवर्ग यांनी यशस्वी विद्यार्थी संघाचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडली असून, त्यांच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


ताजी बातमी

View all

‘आरोग्याची साथ, देवगड पर्यटनाची’ ब्रीद वाक्यावर देवगड कोस्टल हाफ मॅरेथॉन
October 26, 2026
कसाल येथे 22 नोव्हेंबरला भव्य कायदेविषयक सेवा शिबीर
October 26, 2026
Sindhudurg District Bank Tourism Development Initiative
Sindhudurg Bank : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा 'गेमचेंजर' प्लॅन
October 26, 2026
Kasai Dodamarg Nagar Panchayat meeting discussing RMC plant construction allegations
Dodamarg News : ‘आरोप चुकीचे असतील तर गुन्हे दाखल करा’
October 26, 2026
संबंधित बातम्या

View all

‘आरोग्याची साथ, देवगड पर्यटनाची’ ब्रीद वाक्यावर देवगड कोस्टल हाफ मॅरेथॉन
October 26, 2026
भारत-न्यूझीलंड टी-२० मालिका जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ उतरणार मैदानात, कधी अन् कुठे रंगणार सामना? वाचा सविस्तर
October 26, 2026
Ishan Kishan ruled out of the third T20I against New Zealand due to an adductor strain
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यातून 'हा' दिग्गज खेळाडू बाहेर
October 26, 2026
कुणकेश्वर हायस्कूलच्या सार्थक घाडीची ज्युदो स्पर्धेत चमकदार कामगिरी
October 25, 2026