LIVE UPDATES

कसाल येथे 22 नोव्हेंबरला भव्य कायदेविषयक सेवा शिबीर

प्रमुख जिल्हा न्यायाधीशांकडून जागेची पाहणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 26, 2026 06:19 PM
views 68  views

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली) व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) यांच्या निर्देशानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी 22 नोव्हेंबर 2026 रोजी भव्य कायदेविषयक सेवा शिबीराचे (Mega Legal Services Camp) आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरासाठी कसाल (ता. कुडाळ) येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या जागेची निवड करण्यात आली असून, नुकतीच या परिसराची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती श्याम चांडक आणि न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती फरहान दुबाश यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्ह्यातील सर्व वकील संघ तसेच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने 'नाल्सा'च्या (NALSA) नवीन मॉड्यूलनुसार जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने हे शिबीर आयोजित केले जात आहे.

या पार्श्वभूमीवर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष यांच्या उपस्थितीत 22 ऑक्टोबर 2026 रोजी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कसाल येथील परिसराची सविस्तर पाहणी करण्यात आली. सर्व सोयी-सुविधांचा आढावा घेतल्यानंतर शिबीरासाठी हे ठिकाण निश्चित करण्यात आले.

या पाहणी दरम्यान जिल्हा न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली, कुडाळच्या उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, जिल्हा परिषदेचे सहायक गटविकास अधिकारी (ग्रामपंचायत) परेश शिरसाट, मंडळ अधिकारी अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक कनिष्ठ अभियंता शिकांत शिंदे उपस्थित होते.

तसेच जिल्हा न्यायालयाचे अधीक्षक एम. आर. माणगांवकर, एस. डी. गिरकर, एन. एस. सावंत, सहायक अधीक्षक एस. एच. खेडेकर व इतर न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन अवधुत मालणकर, सेक्रेटरी आशिष परब आणि मुख्याध्यापक उत्तम मळगावकर यांनीही यावेळी उपस्थित राहून पाहणीत सहकार्य केले.


ताजी बातमी

View all

Collector Trupti Dhodmise inaugurates two new garbage collection vehicles in Sindhudurg Nagari.
Sindhudurg News : कचरा संकलनासाठी २ नवीन घंटागाड्या दाखल
October 26, 2026
Chief Electoral Officer S. Chokkalingam participates in water conservation activities at Owaliye village in Malvan.
Sindhudurg News : मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे ओवळीयेत जलसंधारण कामात श्रमदान
October 26, 2026
Nitesh Rane announces fisheries development initiatives and a fish seed centre in Vengurla
Vengurla Fish Seed Centre : मच्छिमारांना कुणावरही अवलंबून न ठेवता स्वावलंबी बनवणे हेच सरकारचे ध्येय
October 26, 2026
India updates motor vehicle rules covering E100 ethanol fuel for specially designed and certified flex-fuel vehicles.
१०० टक्के इथेनॉल इंधनाला केंद्राची मंजुरी, सामान्य पेट्रोल कारमध्ये वापर केल्यास काय होईल? वाचा सविस्तर
October 26, 2026
संबंधित बातम्या

View all

Collector Trupti Dhodmise inaugurates two new garbage collection vehicles in Sindhudurg Nagari.
Sindhudurg News : कचरा संकलनासाठी २ नवीन घंटागाड्या दाखल
October 26, 2026
Chief Electoral Officer S. Chokkalingam participates in water conservation activities at Owaliye village in Malvan.
Sindhudurg News : मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे ओवळीयेत जलसंधारण कामात श्रमदान
October 26, 2026
Nitesh Rane announces fisheries development initiatives and a fish seed centre in Vengurla
Vengurla Fish Seed Centre : मच्छिमारांना कुणावरही अवलंबून न ठेवता स्वावलंबी बनवणे हेच सरकारचे ध्येय
October 26, 2026
195 केंद्रांवर उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत मूल्यमापन चाचणी संपन्न
October 26, 2026