LIVE UPDATES

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सीईओ अपूर्वा बासूर यांनी वैभववाडीत घेतले दुर्गामातेचे दर्शन

मंडळाच्या महिला व बालकल्याण योजनांच्या जागर उपक्रमाचे कौतुक
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 14, 2026 14:45 PM
views 94  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

वैभववाडी : सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर यांनी वैभववाडी शहरातील दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळाच्या दुर्गामातेचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या वतीने दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या महिला व बालकल्याण योजनांच्या जागर उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच वैभववाडीकरांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.

दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ, वैभववाडीच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध सामाजिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविले जातात. महिला व बालकल्याण योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मंडळाने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमातून महिला आणि बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे.जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे  यांनी मंडळाच्या या सामाजिक उपक्रमाची दखल घेत कौतुक केले. नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा मंडळाचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सौ.धोडमिसे यांनी वैभववाडीकरांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी तहसीलदार सूर्यकांत पाटील, पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, श्रावणी रावराणे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी स्नेहा माने तसेच दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष डॉ राजेंद्र पाताडे,सचिव संजय रावराणे,  शांताराम रावराणे, गंगाधर केळकर, अविनाश पाटील यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.